महत्वाच्या बातम्या

 अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालय व  जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्यांक हक्क दिवसाचे आयोजन सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सिव्हिल लाईन्स, येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार स्नेहालता पाटील होत्या. प्रमुख वक्ते म्हणून सेंट्रल इंडिया विधी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस.एम. राजन प्रमुख्याने उपस्थित होते. अल्पसंख्यांक दिनानिमित्त तालुकास्तर व शहरातील झोनस्तर आणि महापालिकास्तरावर भितीचित्र स्पर्धा, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करुन अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, योजना शिक्षणाधिकारी भानुदासजी रोकडे, इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्यांक शाळा व संस्थांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी उपस्थित होते.

त्यानंतर अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्य आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात अल्पसंख्याकांच्या हितासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते.

या संस्थांद्वारे अल्पसंख्याकांसाठी चालवण्यात येणाऱ्या योजनाची माहिती सर्व उपस्थित प्रतिनिधींना पत्रकाद्वारे देण्यात आली. यामध्ये शिक्षणाधिकारी योजना कार्यालय, समाज कल्याण विभाग, बार्टी कार्यालय, एम.ए.के. आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचा सहभाग होता.





  Print






News - Nagpur




Related Photos