महत्वाच्या बातम्या

 १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन : १० दिवसांचे हंगामी कामकाज जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. आज अधिवेशनाच्या तात्पुरते कामकाज जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे एकूण कामकाज दहा दिवस म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे राज्य सरकारच्या संसदीय कामकाज विभागाने जाहीर केले आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांत अध्यादेश पटलावर ठेवण्यात येणार असून सन 2022-2023 च्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर मंगळवार, 20 आणि बुधवारी 21 डिसेंबर रोजी दोन्ही सभागृहांत शासकीय कामकाज पार पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, तर गुरुवार, 22 डिसेंबर रोजी पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर शुक्रवारी अशासकीय कामकाजाव्यतिरिक्त पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाणार असून याच दिवशी पुरवणी विनियोजन विधेयकसुद्धा सादर करण्यात येणार आहे. तर अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडय़ात 26 ते 30 डिसेंबरच्या कालावधीत दोन्ही सभागृहांत शासकीय कामकाज असणार असल्याचे संसदीय कार्य विभागाने जाहीर केले आहे. विभागाने जाहीर केलेल्या कामकाजानुसार एकूण दहा दिवस अधिवेशनाचे काम चालणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, विभागाने जाहीर केलेले हे कामकाज तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos