महत्वाच्या बातम्या

 २३ सप्टेंबर ला वर्धा तालुक्यातील दिव्यांगांना साहित्याचे वितरण : कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमच्यावतीने २३ सप्टेंबर रोजी चरखा सभागृह, सेवाग्राम येथे वर्धा तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अंगांचे वितरण करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी येतांना दिव्यांगांनी आवश्यक कागदपत्र घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांग साहित्य वितरण कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणुन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले राहणार असून विशेष अतिथी म्हणुन उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस व प्रमुख पाहुणे म्हणुन आ. रामदास आबंटकर, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ.रणजित कांबळे, आ. दादाराव केचे, आ.समिर कुणावार, आ.डॉ. पंकज भोयर यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमच्यावतीने दिव्यांगांना साहित्य देण्यासाठी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे साहित्य तयार करण्यात आले आहे. वर्धा तालुक्यातील साहित्य वितरणाचा हा कार्यक्रम चरखा सभागृह, सेवाग्राम येथे २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरु राहणार आहे. या शिबिरात वर्धा तालुक्यातील एकून ८२६ दिव्यांग बांधवांना मान्यवरांच्याहस्ते साहित्याचे वितरण केले जातील.

तालुक्यातील ज्या बांधवांचे मोजमाप करण्यात आले आहे. त्यांना साहित्य वितरीत केले जाणार आहे. वर्धा शहरातील दिव्यांग बांधवांना देखील यावेळी साहित्य वितरीत केले जातील. त्यामुळे भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमच्यावतीने १४ ते २३ मार्च या कालावधीत मोजमाप शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या दिव्यांगानी आवश्यक कागदपत्रास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोजमाप शिबिरामधील देण्यात आलेल्या पोचपावती, मुळ आधारकार्ड व आधारकार्डची झेरॉक्स प्रत  घेऊन दिव्यांग साहित्य घेण्याकरीता उपस्थित राहावे, असे वर्धा नगर परिषेदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos