राज्यात उष्णतेची लाट, चंद्रपूर मध्ये सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी  /  चंद्रपूर
:  राज्यासह विदर्भात उष्णतेची लाट  असून आज  चंद्रपूर येथे सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ  ब्रह्मपुरी ४६.५  अंश सेल्सिअस  तापमान नोंदविण्यात आले  आहे. तर  उष्मघाताने नागपुरात दोघांचा मृत्यू झाला आहे. उष्णतेमुळे   नागरिक  हैराण झाले आहेत.  दरम्यान हवामान खात्याने नागपूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर येथे वादळी पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे.
नागपूर शहरात धंतोली परिसरातील लोखंडी पुलाखाली ५० ते ५५ वर्ष वयाच्या एका अज्ञात व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. तर दुसरी घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिहानसमोरील एम्स हॉस्पिलटसमोर घडली. ३५ ते ४० वर्ष वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा झाडाखाली मृत्यू झाला. यात दोन्ही घटनेत पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेच्या लाटेने आता जागतिक पातळीवर आपला प्रभाव टाकला आहे . जगातील सर्वाधिक पाच उष्ण शहरामध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि ब्रह्मपूरी, वर्धा या तीन शहरांचा समावेश आहे. ३० मे पर्यंत उष्णतेची लाट अशीच कामय राहणार असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. २५ मे पासून नवतपाला सुरुवात होत असून ९  दिवस विदर्भातील जनतेला उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.  विदर्भात  अकोला ४५.२, अमरावती ४५, बुलडाणा ४३, ब्रह्मपूरी ४६.५, चंद्रपूर ४६.६  , गडचिरोली ४४.२, गोंदिया ४३.५, नागपूर ४५.६, वर्धा ४६.४, वाशिम ४३, यवतमाळ ४४.५ अंश सेल्सिअस अशी नोंदविण्यात आली आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-22


Related Photos