महत्वाच्या बातम्या

 अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील १ हजार ३०९ रेल्वेस्थानकाचा विकास होणार : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव


- खा. रामदास तडस यांनी अतांराकिंत प्रश्न संख्या २ हजार १९९ अंतर्गत लोकसभेत उपस्थित केला प्रश्न.

- अमृत भारत स्टेशन योजनेतून वर्धा लोकसभा क्षेत्रातील चार स्थानके होणार विकसित.

- पुलगांव, सेवाग्राम, हिंगणघाट व धामणगांव स्थानकांचा योजनेत समावेश.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली (वर्धा) : पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केन्द्र सरकारने रेल्वे विभाग मार्फत देशभरात अमृत भारत स्टेशन योजना सुरु केली असुन या योजनेची उद्दीष्टे, ठळक वैशिष्टे, योजनेसाठी मास्टर प्लॅन, निवडलेल्या स्थानकांमध्ये विकसित होण्याची शक्यता असलेल्या सुविधांचा तपशील, सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत केले जाणार आहे का, योजनेंतर्गत समाविष्ट स्थानकांमध्ये स्थानक-आधारित आवश्यकतेनुसार व्यतिरिक्त पायाभूत सुविधा उपलब्धेबाबत लोकसभेत वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी अतारांकित प्रश्न संख्या २ हजार १९९ अंतर्गत प्रश्न उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.

खा. रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे उत्तर प्राप्त झाले असुन त्यानुसार भारतीय रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी अमृत भारत स्टेशन योजना सुरू करण्यात आली असुन यामध्ये स्टेशनवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे आणि त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे, जसे की स्थानकावरील सुविधा सुधारणे, फुटपाथ क्षेत्र, वेटिंग हॉल, शौचालये, आवश्यकतेनुसार लिफ्ट/एस्केलेटर, स्वच्छता, मोफत वाय-फाय, स्थानिक उत्पादनांसाठी किऑस्क. प्रत्येक स्थानकावरील गरज लक्षात घेऊन एक स्टेशन एक उत्पादन उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाउंज, व्यवसाय बैठकीसाठी जागा, लँडस्केपिंग इत्यादी योजना, या योजनेत इमारतीतील सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाचे एकत्रीकरण, मल्टीमॉडल इंटिग्रेशन, दिव्यांगजनांसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, बॅलेस्टलेस ट्रॅकची तरतूद करण्यात आली आहे, सध्या, या योजनेत भारतीय रेल्वेमध्ये सुधारणा/आधुनिकीकरणासाठी १ हजार ३०९ रेल्वेस्थानक यामध्ये महाराष्ट्रातील १२८ रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत स्थानके विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय निधी वापरला जात आहे. स्थानकांचे आधुनिकीकरण/सुधारणा ही एक सतत चालणारी आणि निरंतर प्रक्रिया आहे आणि यासंदर्भातील कामे आंतर-से-प्राधान्य आणि निधीच्या उपलब्धतेच्या अधीन राहून आवश्यकतेनुसार हाती घेतली जातात. काम मंजूर करताना आणि कार्यान्वित करताना स्थानकांच्या अपग्रेडेशन/आधुनिकीकरणाला प्राधान्य दिले जात असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तरातुन स्पष्ट केले.

अमृत भारत स्टेशन योजनेत महाराष्ट्रातील १२८ रेलस्थानकाचा समावेश असुन यामध्ये वर्धा लोकसभाक्षेत्रातील अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत हिंगणघाट रेल्वेस्थानक विकासाकरिता रु. २३.७ कोटी, सेवाग्राम रेल्वे स्थानक विकासाकरिता रु. १९.४ कोटी, पुलगांव रेल्वे स्थानक विकासाकरिता रु. १७.९ कोटी, धामणगांव रेल्वेस्थानकाच्या विकासाकरिता रु. १९.३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम केले जाणार असून यामध्ये रेल्वेस्थानक  परिसरातील वाहतूक सुधारणा, परिसर सुशोभीकरण, प्रतीक्षागृह उभारणे व सुधारणा, स्वच्छतागृहामध्ये सुधारणा व अन्य विकासकामे होणार आहेत, यामुळे वर्धा लोकसभा क्षेत्रातील रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे, वर्धा लोकसभा क्षेत्रातील मोठे असलेले वर्धा रेल्वेस्थानक मॉडेल स्टेशन विकसीत करण्यात आले असुन अमृत भारत योजनेत तुलनेने लहान असलेली रेल्वेस्थानके विकसीत करण्यात येणार आहे, लहान शहरातील प्रवाश्यांना देखील मोठया स्थानकासारख्या सोईसुविधा उपलब्ध व्हाव्या या उददेंशाने १ हजार ३०९ रेल्वेस्थानके निवडण्यात आली, फक्त निवड करण्यात आली नसुन येत्या ०६ तारखेला या रेल्वेस्थानकाचा भुमीपूजन सुध्दा होणार असल्याचे  यावेळी खा. रामदास तडस म्हणाले.





  Print






News - World




Related Photos