गडचिरोली जिल्ह्यात ५ दलाचे पोलीस जवान सांभाळणार निवडणूक सुरक्षेची जबाबदारी


-  बीएसएफ, सीआयएफची जवान दाखल होणार
-   सीआरपीएफचे  पोलीस महानिरीक्षक राजुकमार  यांनी घेतला  सुरक्षेचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/ गडचिरोली :
जिल्ह्यातील नक्षली कारवाया लक्षात घेता चिमूर- गडचिरोली या लोकसभा क्षेत्राची निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्याचे आवाहन पोलीस दलापुढे उभे ठाकले आहे. सीआरपीएफ व जिल्हा पोलीस दलाने हे आव्हान स्विकारले असून भयमुक्त वातावरणात  निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. निवडणूकीत   सुरक्षेची जबाबदारी  ५ दलाचे पोलीस जवान सांभाळणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच  बीएसएफ व सीआयएफ च्या जवानांना तैनात करण्यात येण्याची शक्यता आहे.  सिआरपीएचे पोलीस महानिरीक्षक  राजुकमार यांनी आज  सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
पोलीस महानिरीक्षक राजकुमार यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना सांगितले की,  पोलीस दलाच्या नक्षलविरोधी कामगिरीमुळे १७ व्या लोकसभेच्या निवडणूकीत गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांची संख्या ३३ ने कमी झाली आहे.  लोकसभा निवडणूक प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सीआरपीएफ  बरोबर  जिल्हा पोलीस दलाचे सी-६० जवान, क्युआरटी दल, बीएसएफ व सीआईएफ च्या जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.  जिल्ह्यात निवडणूक शांतते व सफलापुर्वक पार पाडण्यात येईल, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक राजकुमार यांनी दिली.
 सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रात ६९.०७ टक्के मतदान झाले होते. आता २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविणार भर देण्यात आला असून पोलीस दलाने ७५ टक्के मतदानाचे उदिष्ट ठेवले आहे. हे उदिष्ट यावर्षी गाठण्यात प्रशासन यशस्वी होईल, असा आशावाद पोलीस महानिरीक्षक राजकुमार यांनी व्यक्त केला.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos