मिशन लक्ष्यवेध अंतर्गत टेबल टेनिस खेळाडूंसाठी निवड चाचणी ३० जुलै रोजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी टेबल टेनिस खेळाडूंची निवड चाचणी ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेले अथवा राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त २५ वर्षांखालील (३१ डिसेंबर रोजीचे वय) मुले-मुली या निवड चाचणीत सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे व बोनाफाईड प्रमाणपत्राची मूळ प्रत सोबत आणावी. निवास व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी.
अधिक माहितीसाठी असद सय्यद (९९२३०३२७८७), ईश्वर कदम (९८५०९९९३०७) किंवा अनिल बंदेल (९६०४६२९५६१) यांच्याशी संपर्क साधावा. गडचिरोली जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी होऊन विभागीय क्रीडा निपुणता केंद्रात प्रवेशाची संधी मिळवावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




