जागेच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला : लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : लाखनी तालुक्यातील सिंधीपार/मुंडी येथे घराच्या वरणीच्या जागेवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून दाम्पत्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी संतोष बक्षी दिघोरे ३५, वर्ष रा. सिंधीपार/मुंडी यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास शत्रुघ्न नामदेव टेंभुर्णे ५० वर्ष व नलिनी शत्रुघ्न टेंभुर्णे ४५ वर्ष यांनी घराची पाल फाडल्याच्या कारणावरून संतोष दिघोरे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर दोघांनी संगनमत करून संतोष दिघोरे यांच्या डोक्याजवळ लाकडी काठीने मारहाण केली.
यावेळी संतोष दिघोरे यांच्या पत्नीच्या हातावरही काठीने वार करून त्यांना दुखापत करण्यात आली. तसेच आरोपींनी त्यांच्या मुलांनाही मारहाण करत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीच्या आधारे लाखनी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




