महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१२ जून महत्वाच्या घटना

१८९६ : जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.

१८९८ : फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९०५ : गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.

१९१३ : जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म.

१९४० : दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.

१९४२ : अॅन फ्रॅंक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.

१९४४ : दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.

१९६४ : वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

१९७५ : अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.

१९९३ : पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.

१९९६ : भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.

२००१ : कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.

२०१४ : इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.

१९९१ : बोरिस येल्तसिन - यांची रशियाचे पहिले अध्यक्ष म्हणून लोकशाही पद्धतीने निवड.

१९९० : रशिया दिन - रशियन फेडरेशनच्या संसदेने औपचारिकपणे त्याचे सार्वभौमत्व घोषित केले. 

१९४४ : दुसरे महायुद्ध - ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.

१९४३ : होलोकॉस्ट - जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.

१९३५ : चाको युद्ध - बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.

१२ जून जन्म

४९९ : ४९९ई.पुर्व : भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म.

१८९४ : बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)

१९१७ : लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २०१२)

१९२४ : अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म.

१९२९ : जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अ‍ॅना फ्रँक यांचा जन्म.

१९१७ : लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म.

१९५७ : पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक जावेद मियाँदाद यांचा जन्म.

१९८५ : मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक ब्लॅक रॉस यांचा जन्म.

१९८२ : भारतीय वेटलिफ्टर - कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक शैलजा पुजारी यांचे निधन

१९५७ : हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक - आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार गीतांजली श्री यांचा जन्म

१९३९ : भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक ओबेदुल्ला अलीम यांचा जन्म (मृत्यू : १८ मे २००३)

१८८६ : जपानी वास्तुविशारद आणि अभियंते, टोकियो टॉवरचे रचनाकार ताचु नायतो यांचा जन्म (मृत्यू : २५ ऑगस्ट १९७०)

१२ जून मृत्यू

१९६४ : मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली)

१९७८ : चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.

१९८१ : भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९०१)

१९८३ : कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९०२)

२००० : मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)

२००३ : हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९१६)

२०१५ : भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी यांचे निधन.(जन्म: १५ डिसेंबर १९२४)

२०२२ : चित्रपट अभिनेते आणि नाटक कलाकार डी फिलिप यांचे निधन

२०२० : उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी यांचे निधन (जन्म: ७ जुलै १९२६)

२०२० : भारतीय राजकारणी पारसनाथ यादव यांचे निधन (जन्म: १२ जानेवारी १९४९)

२०१२ : अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते एलिनॉर ऑस्ट्रॉम यांचे निधन (जन्म: ७ ऑगस्ट १९३३)

१९७६ : भारतीय संस्कृत विद्वान - पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार गोपीनाथ कविराज यांचे निधन (जन्म: ७ सप्टेंबर १८८७)

१९७२ : भारतीय लेखक दीनानाथ गोपाळ तेंडुलकर यांचे निधन

१९१२ : फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते फ्रेडरिक पासी यांचे निधन (जन्म: २० मे १८२२)

१७५८ : प्रशिय देशाचे विल्यम प्रिन्स ऑगस्टस यांचे निधन (जन्म: ९ ऑगस्ट १७२२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos