जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
  राजे सत्यवान महाराज यांच्या अकाली निधनानंतर या राजघरण्याची जबाबदारी कोणताही अनुभव नसताना माझावर आली. आपण सर्व जनतेने मला प्रेम दिले व ती जबाबदारी पेलण्याची क्षमता निर्माण करुन दिली. २०१४ च्या  निवडणुकीत आपण सर्वांनी  माझ्यावर विश्वास दाखवीत मला भरघोस मतांनी विधानसभेत निवडून पाठवीले. पक्षानेसुध्दा माझ्यावर विश्वास दाखवीत राज्यमंत्री म्हनून शपथ दिली. जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे,  त्याला आपण तडा जावू देणार नाही. केवळ जणतेच्या सेवेसाठीच हा राजपरिवार आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी केले. 
अहेरी इस्टेटच्या राजपरिवाराकडून मागील दोनशे वर्षापासून सुरु असलेली दसरा मोहत्सवाची परंपरा आजही राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या मार्गदर्शनात राजे अम्ब्रीशराव महाराज  हे जपत आहेत . बाहेरून येणाऱ्या  आदिवासी जनतेला कोणताही त्रास होणार नाही,  याची दक्षता स्वत: राजे अम्ब्रीशराव महाराज घेत आहेत.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून या महोत्सवाची सुरुवात होते . तर दसऱ्याच्या  दिवशी या मोहत्सवाची सांगता होते.  नवरात्रीत ९ दिवस उपवास ठेवून राज परिवाराकडून सकाळ - संध्याकाळ कुलदैवतेची पुजा अर्चा केली करण्यात आली. दसऱ्याच्या  दिवशी अहेरी इस्टेटचे सहावे राजे  अम्ब्रीशराव महाराज 
 यांची अहेरी शहरातील मुख्य चौकातून पालखी काढण्यात आली. पालखीतून राजे अम्ब्रीशराव महाराज  मिरवणुकीने गडअहेरी येथील गडीदेवीची विधीवत पुजा करुन सर्व जणतेसाठी देवीचा आशीर्वाद मागीतला. राजपरिवारातील प्रमुख उपस्थितीत राज पुरोहीता कडून आपट्याच्या झाडाची विधीवत पुजा करुन  ते सोन्याच्या रुपात एकमेकांना दिले जाते. विधीवत पुजा होत पर्यत सोने वाटले जात  हे विषेश. सर्व पुजा अर्चा झाल्यावर राजेंची पालखी राजमहालात आणली जाते. रस्त्यात राजे अम्ब्रीशराव महाराज  याना  पालखीत बघण्यासाठी लहान थोर एकच गर्दी करतात. सर्व जनतेचे अभिवादन स्वीकारत राजे अम्ब्रीशराव महाराज  यांची पालखी राजमहालात आली. क्रिष्णा मंचार्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी अहेरी,चिंचगुडी,बोरी व लगाम येथील भोई समाजातील लोकांनी वाहून आणली. राजे अम्ब्रीशराव महाराज  पालखीतून खाली येत राजमहल परिसरात  उपस्थित आदिवासीसह विविध धर्मातील लोकांना मार्गदर्शन केले. 
आम्ही पदावर असु किंवा  नाही पण जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तयार असू. मागील चाळीस वर्षात जी  कामे झाली नाहीत ती  करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. रस्ते, विज, शिक्षण, आरोग्य, पाणी , सिंचन, तलाव, नदीनाल्यावर मोठे पुल व आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आपण काम करीत आहोत. विरोधकांच्या अपप्रचाराला आपण महत्त्व न देता चांगले काय झाले ते बघा. आजपर्यंत आपण चांगलेच काम केले आहे. पुढे सुध्दा आपण मला साथ दिली तर मी आपल्या विकासासाठी कामे करेल. शासन आदिवासी समाजासाठी विविध कल्याकारी योजना राबवित आहे. याचा आपण फायदा घ्यावा असे आवाहन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज  यांनी केले.
  शासनाकडून बौद्ध समाजाला मिळालेल्या जमीनीवर आपण आपल्या विकास निधीतून दिड कोटी रुपये मंजुर करुन जिल्ह्यात एक भव्य बुद्ध विहार उभारण्याची घोषणा राजे अम्ब्रीशराव महाराज  यांनी केली. तसेच आदिवासी समाजाचे गोटुल बांधण्यासाठी  जागा उपलब्ध करुण  भव्य गोटुल उभारण्याचा मानस त्यानी व्यक्त केला.राजे अम्ब्रीशराव महाराज  यांच्या मार्गदर्शनानंतर राजेंना उपस्थितीत मान्यवरांनी व जनतेने आपट्याचे पाने सोने  म्हणून भेट देत विजयादशमीच्या शुभेच्छा  दिल्या. त्यानंतर आदिवासी समाजातील महिला व पुरुषांनी रात्रभर रेला नृत्यासह विविध आदिवासी नृत्य सादर केले. 
या प्रसंगी  अवधेशबाबा ,चिंटूबाबा संतोष    व राजपरिवारातील सदस्य उपस्थित होते. अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील व जवळच्या तेलंगाना व छतीसगढ राज्यातुन नागरिक दसरा महोत्सवासाठी आले होते.  कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्राचार्य अनिल कत्रोजवार यांनी मानले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-20


Related Photos