ऐझॉल रेल्वे नकाशावर : मोदींकडून १३ सप्टेंबरला बैराबी-सैरांग मार्गाचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / ऐझॉल : मिझोरमची राजधानी ऐझॉल अखेर भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी बैराबी-सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार असून, या ऐतिहासिक क्षणानंतर ईशान्येकडील या राज्याला देशाशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
५१.३८ किमी लांबीच्या या प्रकल्पात तब्बल ४८ बोगदे आणि ५५ मोठे व ८७ लहान पूल उभारले गेले आहेत. विशेष म्हणजे १९६ क्रमांकाचा पूल १०४ मीटर उंच असून, तो दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा जास्त उंच आहे.
मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी १२ सप्टेंबर रोजी ऐझॉलमध्ये दाखल होतील व दुसऱ्या दिवशी रेल्वे मार्गाचे लोकार्पण करतील. सैरांग रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे सुविधा केंद्र म्हणून विकसित होणार असून, येथून राजधानी एक्सप्रेस सेवा सुरू होईल.
अॅक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत उभारण्यात आलेला हा प्रकल्प ईशान्येकडील राज्यांमध्ये व्यापार, पर्यटन व वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देईल. ऐझॉल प्रथम आसाममधील सिलचरशी जोडले जाईल व त्यानंतर संपूर्ण देशाशी थेट संपर्क साधेल.
News - World




Petrol Price




