आजचे दिनविशेष


२० नोव्हेंबर महत्वाच्या घटना
१७८९ : न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.
१८७७ : थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला.
१९१७ : युक्रेन प्रजासत्ताक बनले.
१९४५ : न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.
१९५९ : युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.
१९८५ : मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० प्रकाशीत झाले.
१९९४ : भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.
१९९७ : अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.
१९९८ : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
१९९९ : अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.
१९९९ : आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.
२००८ : अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
२० नोव्हेंबर जन्म
१६०२ : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक यांचा जन्म.
१७५० : म्हैसूर चा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे १७९९)
१८५४ : कवी, निबंधकार व नाटकाकर मोरो गणेश लोंढे यांचा जन्म.
१८८९ : अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५३)
१८९२ : इंसुलिन चे सह्संशोधक जेम्स कॉलिप यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९६५)
१९०५ : संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९९८
१९१० : डच भौतिकशास्त्र विलेम जेकब व्हान स्टाॅकम यांचा जन्म.
१९२४ : फ्रेंच गणितज्ञ बेनुवा मँडेलब्रॉट यांचा जन्म.
१९२७ : न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म.
१९३९ : साहित्यिक वसंत पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००३ – नाशिक)
१९४१ : उर्दू लेखिका हसीना मोईन यांचा जन्म.
१९६३ : इंग्लिश गणितज्ञ तिमोथी गॉवर्स यांचा जन्म.
१९६९ : अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांचा जन्म.
२० नोव्हेंबर मृत्यू
१८५९ : स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १७७९)
१९०८ : बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त यांना फाशी.
१९१० : रशियन साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८२८)
१९५४ : सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाइड व्हर्नन सेसेना यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८७९)
१९७० : ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १८८४)
१९७३ : पत्रकार व समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८८५)
१८८४ : लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९११)
१९८९ : किरण घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे निधन. (जन्म: १९ मे १९०५ – बडोदा)
१९९७ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.
१९९८ : संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी यांचे निधन.
१९९९ : तमाशा कलावंत (सोंगाड्या) दत्ता महाडिक पुणेकर यांचे निधन.
२००३ : सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे पहिले राष्ट्राध्यक्ष डेव्हिड डेको यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)
२००७ : रोडेशिया देशाचे पहिले पंतप्रधान इयान स्मिथ यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९१९)
२०१६ : ग्रीस देशाचे ६वे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी कॉन्स्टँटिनोस स्टेफानोपॉलोस यांचे निधन (जन्म: १५ ऑगस्ट १९२६)
१५९७ : स्वीडनच्या राजकुमारी एलिझाबेथ यांचे निधन (जन्म: ५ एप्रिल १५४९)




Petrol Price




