सरकारने जारी केला व्हॉट्सअ‍ॅप नंबर : 'कोरोना' व्हायरस संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
  कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगभरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही कोरोना विषाणूमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे .  या कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता सरकारने कोरोनावर व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट तयार केला आहे. भारत सरकारने त्याचे नाव MyGov Corona Helpdesk ठेवले आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर 9013151515 जारी केला आहे. या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाच्या मदतीने आपण कोरोना विषाणूबद्दल राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाच्या मदतीने कोरोना विषाणूशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ शकता.
MyGovindia च्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. ' 9013151515 वर हॅलो लिहून आपण कोरोना विषाणूशी संबंधित माहिती मिळवू शकता असे ट्विट केले आहे.
आतापर्यंत, देशभरात १७३ लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यात 25 परदेशी नागरिकांचा समावेश आहेत. त्याचबरोबर, भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर 20 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे आणि सध्या एकूण 149 सक्रिय रुग्ण देशभरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
त्यात देशात संक्रमित लोकांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. येथे 47 लोकांवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी केरळमधील 27 जणांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. कर्नाटकात 14, दिल्लीत 12, उत्तर प्रदेशात 16, लडाखमध्ये आठ, जम्मू-काश्मीरमध्ये चार, हरियाणामध्ये तीन आणि पंजाबमध्ये दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.  Print


News - World | Posted : 2020-03-20


Related Photos