काँग्रेसच्या किसान आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :   लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी तो मागे घ्यावा अशी विनती वारंवार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांना करण्यात येत असली तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राहुल यांच्या समर्थनार्थ एकाही काँग्रेस नेत्याने अद्यापपर्यंत राजीनामा दिलेला नव्हता. मात्र, काँग्रेसच्या किसान आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ व सन्मानार्थ आपण राजीनामा देत असल्याचे पटोले यांनी या राजीनामापत्रात म्हटले आहे.  Print


News - World | Posted : 2019-06-30


Related Photos