अल्पसंख्याक समाजासाठी शासकीय योजना उपलब्ध करुन देण्याकरीता आयोग कटिबध्द


- हाजी अराफत शेख यांची माहिती 
- अल्पसंख्याक समुदायांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
राज्यातील अल्पसंख्यांक समुदायाचे सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी राज्य अल्पसंख्यांक  आयोग कटिबध्द असून  संपुर्ण योजना उपलब्ध करुन देण्यासाठी आयोग पुढाकार घेईल, तेव्हा अल्पसंख्याक समुदायांनी योजना लाभ घ्यावा  असे आवाहन अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केले.
 जिल्हाधिकारी कार्यालयात आयेाजित  राज्य शासन व केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी बाबतचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, जुनेद खान, राजा अदाटे, दिपक कैतके  प्रामुख्याने उपस्थित होते.
  यावेळी पुढे बोलतांना शेख  म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजासाठी  शासन विविध योजना राबवून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. प्रत्येक्ष लाभार्थ्यांना या योजनाचा लाभ मिळतो की नाही, त्यात काही अडचणी आहेत काय या बाबत जाणुन घेण्यासाठी आतापर्यंत 19 जिल्ह्यांना  भेट देत असून त्यांचा साप्ताहिक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करीत आहे.  तसेच जिल्हयातील मुस्लीम समाजासाठी  दफन भुमिच्या विकासासाठी  निधी प्राप्त करुन देण्यात येईल. त्याकरीता शासनस्तरावर पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे.
  गडचिरोली येथे आल्यानंतर त्यांनी जिल्हयातील पारशी, जैन, बौध्द, मुस्लिम  बांधवासमवेत बैठक घेउुन साधक बाधक चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि त्यांच्या समस्या निकाली काण्याचे आश्वासन यावेळी शेख  यांनी दिल्या.
 अल्पसंख्याकांच्या योजना राबवित असलेल्या विविध विभागाच्या कार्यालय प्रमुखांकडून माहिती अवगत केली आणि सर्व योजना, लाभाचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता त्या पुर्ण करुन शासनाकडे पाठवाव्यात व तसे आयोगाला कळवावे, जेणे करुन शासन स्तरावर पाठपुरावा करण्यास सुलभता येईल. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी, अल्पसंख्याक समुदायाचे  सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-19


Related Photos