केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता जुलै २०२१ पर्यंत स्थगित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
करोना संकटामुळे आर्थिक गणित बिघडल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने १ जानेवारी २०२० ते १ जुलै २०२१ या काळासाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा भत्ता स्थगित केल्यामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या वित्तीय वर्षात सरकारला एकूण ३७ हजार ५३० कोटी रुपयांचा फायदा होईल, अशी माहिती अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याचे तीन टप्पे मिळणार होते, ते जवळपास दीड वर्षासाठी आता मिळणार नाहीत. महागाई भत्त्याचा पुढील टप्पा आता थेट जुलै २०२१ नंतरच मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम १.१३ कोटी कुटुंबावर होणार आहे. शिवाय केंद्र सरकारच्या ४८ लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना हा भत्ता मिळणार नाही.  Print


News - World | Posted : 2020-04-23


Related Photos