ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग धंद्यांना माफक परवानगी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करत नवी माहिती देत आवाहनंही केले आहे. अर्थचक्र फिरायला हवे . त्यामुळे २० तारखेपासून काही प्रमाणात परवानगी मिळेल. काही जिल्हे कोरोनामुक्त आहेत. काही ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये घट होत आहे. आपण झोन केलेले आहेत त्यामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे झोन केले आहेत. ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांतील उद्योगांना परवानगी देणार,' अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
'तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणार असाल तर आम्ही धान्य पुरवू. आता मला कोणताच धोका पत्कारायचा नाही. काहीही न करता शांत राहाणं ही मोठी शिक्षा...पण आपण ते करतोय. पण हळूहळू शिथिलता आणणार मुभा देत आहोत...शेती, जीवनावश्यक गोष्टी याच्यामध्ये अडचण येणार नाही. जिल्ह्याच्या वेशी आपण उघडणार नाही. जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच वाहतुकीला परवानगी. ३ मे पर्यंत हे बंधन आपल्याला पाळायचं आहे,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्यात रेड झोनमध्ये ८ जिल्हे आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद यांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा प्रभाव मध्यम असलेल्या जवळपास १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया हे जिल्हे आहेत.
आतापर्यंत कमी कोरोना रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. राज्यात ९ असे जिल्हे आहेत जिथे अजुन कोरोनाचा फारसा प्रभाव नाही. यामध्ये धुळे, नंदूरबार, सोलापुर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत.
News - Rajy | Posted : 2020-04-19