गुंडापल्ली परिसरात दुचाकीसह ६ लाख ५५ हजारांचा दारूसाठा जप्त


- आष्टी पोलीसांची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी :
स्थानिक पोलिसांना मिळालेल्या माहितीनूसार गुंडापल्ली परिसरात  केलेल्या धडक कारवाईत दुचाकी वाहनासह एकुण ६ लाख ५५ हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. 
गडचिरोली जिल्हयातील अवैध दारू विक्री तसेच बेकायदेशिर दारू वाहतुकीस आळा बसावा याकरिता पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्यातील अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर धाड टाकून प्रभाविपणे कायदेशिर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारी पार पाडतांना काल १७ एप्रिल ला आष्टी गुन्हे शाखेला गोपनिय सुत्रांकडून गुंडापल्ली येथील ठोक दारू विक्रेते नेपाल हजारी मिस्त्री तसेच त्याचे वडील हजारी मिस्त्री व इतर दोन अनोळखी व्यक्ती अवैध मोहदारू विक्री करण्याच्याउद्देशाने  गुंडापल्ली परिसरातील तुमडी नाल्याच्या काठावर हातभट्टी लावून मोहादारू गाळत असल्याबाबातची माहीती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेने सदर माहिती अपर पोलीस अधिक्षक डाॅ. मोहित कुमार गर्ग यांना देवून त्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आष्टी गुन्हे शाखेकडील पोलीस पथक हे अवैध दारू गाळणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याकरीता गुंडापल्ली जंगल शिवारातील तुमडी नाल्याचे काठाने शोध घेत असतांना तुमडी नाल्याच्या काठावर हातभट्टी लावून मोहादारू गाळत असल्याचे निदर्शनास आले असता  पोलिस पथकाने धडक कारवाई करत असतांना आरोपींना पोलिसांच्या हालचालीची चाहूल लागताच घनदाट जंगलाचा फायदा घेवून आरोपी घटनास्थळावरून पळाले. 
घटनास्थळी पाहणी केली असता प्रति लिटर ३०० रूपये याप्रमाणे ५० लिटर क्षमतेच्या ६ प्लास्टिक कॅन एकुण किंमत ६०  हजार रूपये , १००  रूपये प्रति किलो याप्रमाणे प्रत्येकी २०० किलो क्षमतेच्या एकुण ११  प्लास्टिक ड्रम मध्ये ३ लाख ८० हजाराचा मोहसडवा, तसेच १०० रुपये प्रति किलो याप्रमाणे प्रत्येकी १०० किलो क्षमतेच्या एकुण १४ प्लास्टिक ड्रम मध्ये १ लाख ४० हजारांचा मोहसडवा व दारूची वाहतूक करण्याकरिता वापरण्यात आलेली ७५ हजार रूपये किंमतीची नंबर प्लेट नसलेली पल्सर कंपनीची मोटार सायकल असा एकुण ६ लाख ५५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करून ताब्यात घेण्यात आला  असून आरोपिंविरूध्द पोलिस स्टेशन आष्टी येथे कलामान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई गडचिरोली पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधिक्षक डाॅ. मोहित कुमार गर्ग यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे सफी दादाजी करकाडे, पोहवा निलकंठ पेंदाम, मपोना पुष्पा कन्नाके, पोना सुनिल पुट्टावार, पोना शुक्राचार्य गवई, चापोशि ईश्वर पेंदाम यांनी केली.
सध्या संपूर्ण देशात कोविड १९ या साथीच्या रोगाची आपत्तीजनक परिस्थीती निर्माण झालेली असुन महाराष्ट्र राज्यात लाॅकडाउन असल्याने या कालावधीत अवैध दारू विक्री व बेकायदेशिर दारू वाहतुक होणार नाही याकरिता स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अहोरात्र अवैध दारू विक्रीवर धाड टाकून प्रभाविपणे कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून गडचिरोली जिल्हयात होत असलेल्या प्रभावी कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणारे तसेच बेकायदेशिर रित्या दारूची वाहतुक करणाऱ्या लोकांचे धाबे दणानले आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-18


Related Photos