प्रियकरासोबत पळून जात असलेल्या एका विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार


-  उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील घटना 
वृत्तसंस्था / देवरिया :
प्रियकरासोबत पळून जात असलेल्या एका विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं असल्याचे वृत्त नवभारत टाइम्सने दिले आहे. 
 पीडित तरुणीचे गावातीलच एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तरुणीचा विवाह अन्य व्यक्तिशी झालेला असूनही पीडितेने तरुणाशी संबंध सुरूच ठेवले होते. तरुणीने प्रियकराच्या संगनमताने तिथून पळून जाण्याचा बेतही आखला होता आणि त्यानुसार ते दोघंही शुक्रवारी रात्री गौरीबाजार इथे पोहोचले. त्यावेळी तिथे असणाऱ्या तीन आरोपींनी तरुणाला मारहाण करून तिथून पळवून लावलं आणि तरुणीला पळवून नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिघांपासून स्वतःची सुटका करून तरुणीने पोलीस स्टेशन गाठले आणि तिन्ही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवलं असून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.  Print


News - World | Posted : 2019-04-21


Related Photos