महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र गौरव पुरस्काराची परंपरा जोपासणे कौतुकास्पद : खासदार रामदास तडस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कृतज्ञता आणि आभार व्यक्त करणे ही मानवी मूल्याची अतिशय महत्त्वाची अंगे आहेत. समाजात या भाविक मूल्याची जोपासना अविरितपणे करणारी एका संस्था म्हणजे जय हिंद सेवाभावी संस्था. विभिन्न क्षेत्रात लक्षणीय कामगारी करणाऱ्या व्यक्तीच्या शोध घेऊन त्यांच्या कौतुकाच्या समारंभ आयोजित होणारा उपक्रम बोधप्रध व अनुकरणीय आहे. अशी गुणग्राहकता जोपासणे ही संस्कृती संवर्धनासाठी आवश्यक बाब आहे. असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. ते ३० जुलै रोजी त्यांच्या कार्यालयात परभणी हून आलेल्या जयहिंद सेवाभावी संस्थेच्या प्रतिनिधी मंडळा सोबत संवाद साधताना बोलत होते.

येत्या २७ ऑगस्ट रोजी वर्धा येथे महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहोळ आयोजित होत असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषविण्याबाबत निमंत्रण देण्यात आले.  यावेळी संस्थेत तर्फे त्यांच्या सत्कार करण्यात आला. 

यावेळी जय हिंद सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार, प्रदेश अध्यक्ष इंजिनियर आर.डी. मगर, मोहम्मद इलियास बोगाणी, हाजी शेख शरीफ, परभणी जिल्हा अध्यक्ष योगेश मुडीकर, ज्येष्ठ समाजसेवक इम्रान राही, राजू लभाने, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष विजय सत्यम, आदर्श शिक्षक मोहन मोहिते, उल्हास वाघ, राजेश धोपटे, ऐहसान राही, अब्दुल गणी, नौशाद पठान, प्रमुख्याने उपस्थित होते.    





  Print






News - Wardha




Related Photos