हनुमान जयंतीनिमित्त सेमाना देवस्थानात 'जय हनुमान' चा गजर, पहाटेपासून भाविकांची रीघ


प्रतिनिधी / गडचिरोली : श्रीराम भक्त हनुमान जयंती निमित्त आज १९ एप्रिल रोजी गडचिरोली वासीयांचे आराध्य दैवत असलेल्या सेमाना येथील हनुमान मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे.
श्री क्षेत्र सेमाना देवस्थान येथे गडचिरोलीतीलच नव्हे तर इतरही ठिकाणाहून भाविक दाखल झाले आहेत. भविकांसाठी महाप्रसाद, भोजनाचे आयोजन विविध मंडळांच्या वतीने महाप्रसाद, पिण्याचे पाणी तसेच अन्य व्यवस्था करण्यात आल्या आहेत. शहरातील विविध वॉर्डातील हनुमान मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दिवसभर भजन, पूजन व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-19


Related Photos