महत्वाच्या बातम्या

 देशात रोज २४६ मुली तर १ हजार २७ महिला होतात बेपत्ता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालानुसार देशात दररोज २४६ मुली आणि १ हजार २७ महिला बेपत्ता होत आहेत. कडक कायदे असूनही दररोज ८७ महिलांवर बलात्कार होत आहेत.

वर्ष २०२१ मध्ये राजस्थानमध्ये ६ हजार ३३७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले.

मध्य प्रदेशात ही संख्या २ हजार ९४७  उत्तर प्रदेशात २ हजार ८४५ आणि महाराष्ट्रात २ हजार ४९६ आहे. मध्य प्रदेशात एका वर्षात १३ हजार ३४ मुली आणि ५५ हजार ७०४ महिला बेपत्ता झाल्या. महाराष्ट्रात ३ हजार ९३७ मुली आणि ५६ हजार ४९८ महिला बेपत्ता झाल्या आहेत. जर आपण संपूर्ण देशाबद्दल बोललो, तर २०२१ मध्ये ९ हजार ११३ मुली बेपत्ता झाल्या, तर बेपत्ता महिलांची संख्या ३ लाख ७५ हजार ५८ होती.

मणिपूरमधील घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना महिलांवरील गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. महिला अत्याचाराची घटना राजस्थान, छत्तीसगड किंवा मणिपूरमधील असो, कठोर कारवाई झालीच पाहिजे असे त्यांनी सांगितले.

एनसीआरबीच्या अहवालात असे म्हटले आहे की २०२१ मध्ये राजस्थानमध्ये ६ हजार ३३७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्काराचा हा आकडा कोणत्याही राज्यात सर्वाधिक ठरला आहे. मध्य प्रदेशात २ हजार ९४७, यूपीमध्ये २ हजार ८४५, महाराष्ट्रात २ हजार ४९६ आणि छत्तीसगडमध्ये १ हजार ९३ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. देशात पाच वर्षांत म्हणजे १ हजार ८२५ दिवसांत दीड लाख महिलांवर बलात्कार झाले आहेत. म्हणजे रोज ८७ महिला या अपराधाला बळी पडत आहेत.

एनसीआरबीचा वर्ष २०२१ चा अहवाल सांगतो की, छत्तीसगड बलात्काराच्या घटना असलेल्या टॉप १० राज्यांमध्ये समाविष्ट नाही. २०२० च्या अहवालातही छत्तीसगडचा समावेश पहिल्या १० राज्यांमध्ये नाही.

बलात्कारात राजस्थान अव्वल -

वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये राजस्थान अव्वल ठरले आहे. २०१९ मध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक ५ हजार ९९७ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. २०१८ मध्ये मध्य प्रदेश बलात्काराच्या ५ हजार ४३३ प्रकरणांसह पहिल्या क्रमांकावर होता. राजस्थानचा क्रमांक दुसरा होता. २०१७ मध्येही मध्य प्रदेश बलात्काराच्या घटनांमध्ये अव्वल राहिला. दुसरा क्रमांक उत्तर प्रदेशचा होता. राजस्थान तिसऱ्या स्थानावर होता.

२०२१ मध्ये देशात एकूण ३१ हजार ६७७ बलात्काराच्या घटना घडल्या. २०२० मध्ये बलात्काराच्या २८ हजार ४६ घटना घडल्या. बळींची संख्या पाहिली तर हा आकडा २८ हजार १५३ इतका आहे. २०१९ मध्ये बलात्काराच्या ३२ हजार ३३ घटना घडल्या. त्यापैकी पीडित महिलांची संख्या ३२ हजार २६० आहे.

२०१८ मध्ये एकूण ३३ हजार ३५६ बलात्काराच्या घटना घडल्या. बळींची संख्या ३३ हजार ९७७ झाली आहे. २०१७ मध्ये ३२ हजार ५५९ बलात्काराच्या घटना घडल्या. या प्रकरणांमध्ये बळींची संख्या ३३ हजार ६५८ झाली आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच वर्षात १ लाख ५९ हजार ४८ हून अधिक बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.





  Print






News - World




Related Photos