जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी
: आलापल्ली - भामरागड मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ काल १७ एप्रिल रोजी महिंद्रा मॅक्स आणि आयशर ट्रकच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या चारही मृतकाच्या कुटुंबीयांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट घेऊन मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली तसेच सांत्वन केले. 
अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथून काही प्रवासी सकाळी ११ वाजताच्या  सुमारास आलापल्ली येथून भामरागड येथे आठवडी बाजाराकरिता जात होते. ट्रक क्रमांक  एम एच ३४ एम ३७२८  व पेरमिली (मांड्रा) येथील प्रवासी वाहनाची  जोरदार धडक झाली . या धडकेत प्रवासी  वाहनातील चार जण जागीच ठार झाले. तसेच या अपघातात १७ प्रवासी  जखमी झाले असून त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विचारपूस केली. विनोद राजना सुरमवार  (२५)  रा. वेलुगुर दामरंचा, झुरी दरसा गावडे (५० ) रा. कोळसेपल्ली,  कुरमा लेकाम (५०) रा. कोळसेपल्ली, चूको करपा आत्राम (७०) रा.  कोळसेपली  यांचा या अपघातात मृत्यू झाला.  जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय  कंकडालवार यांनी या मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत केली. यावेळी संतोष ताटीकोंडावार, गोपाल सुरमवार, श्रीकांत बंडमवार,  प्रशांत गोडसेलवार,  लक्ष्मण आत्राम उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-18


Related Photos