विद्युत शॉक लागून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू , भालेवाडी येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  मारेगांव : 
तालुक्यातील भालेवाडी येथील तिन वर्षीय  बालकाचा  विद्युत  शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज १८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली . ओम सुनिल गदाई असे मृतक बालकाचे नाव आहे.  
 विजेचा धक्का लागल्याने  बालक बेशुद्ध पडला. त्याला मारेगांव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बालकाची तपासणी केली असता बालकास मृत घोषित केले . बालकाच्या मृत्यूमुळे भालेवाडी येथे शोककळा पसरली आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-18


Related Photos