महत्वाच्या बातम्या

 गोपनिय सूत्राद्वारे एकूण ९ लाख ४८ हजार ८००/- रुपये किंमतीचा दारु मुद्देमाल व वाहन जप्त : गडचिरोली पोलीस स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : २९ जुलै २०२३ रोजी गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांचे दोन पथके तयार केले. एक पोलीस पथक मुख गावात जाणाऱ्या रस्त्यावर पाळत ठेवले असता, दुचाकी वरून २८ हजार ८००/- रुपये किमतीच्या २ बॉक्स विदेशी दारूची वाहतूक करतांना मिळुन आल्याने ईसम अमित यशवंत रोहणकर (वय २५ वर्षे), रा. मोखाडा ता. सावली जि. चंद्रपुर यांस मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेवून पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

दूसरे पोलीस पथक कोटगल चौकात सापळा रचून बसले असतांना, एक संशयीत दुचाकी वाहन येत असल्याचे दिसल्याने वाहनाची तपासणी केली. वाहन चालक व मागे असलेल्या इसमाच्या मध्ये ४० नग विदेशी दारुच्या बाटला मिळून आल्याने ईसम येलंधर मलय्या गनबोईनवार, (वय ४७ वर्षे), रा. कनेरी ता.जि. गडचिरोली, विनोद मधुकर मेश्राम, (वय २८ वर्षे), रा. पारडी ता. जि. गडचिरोली यांना मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेवून पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

गडचिरोली कॉम्प्लेक्स परीसरात नाकाबंदी दरम्यान एका संशयीत वाहनास थांबण्याचा ईशारा करताच वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी करून दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांस ताब्यात घेवून त्याचे व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता, वाहनात २ लाख ४८ हजार /- रुपये किंमतीच्या देशी दारूचे एकूण ३१ बॉक्स व दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी मिळून आल्याने इसम आकाश पुरुषोत्तम कापकर, (३० वर्षे ) व्यवसाय वाहन चालक, रा. सर्वोदय वार्ड क्रमांक ४, गडचिरोली ता. जि. गडचिरोली याचेविरुध्द पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

एकाच रात्रो अशा एकूण वेगवेगच्या तीन घटनामध्ये २ लाख ८८ हजार ८००/- रुपये किमतीचा दारु मुद्देमाल व ६ लाख ६० हजार रुपये किमतीचे दारु वाहतुकीकरीता वापरलेले वाहन असा एकुण ९ लाख ४८ हजार ८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे, सपोनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात नापोशि/ दिपक लेनगुरे, अकबर पोयाम, सतीश कतीवार, पोअं/ श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे , मंगेश राऊत, चापोना / मनोहर तोगरवार, माणिक निसार यांनी केलेली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos