अकोला जिल्ह्यातील कवठा मतदान केंद्रावरील ईव्हीएम मतदाराने फोडले


वृत्तसंस्था /  अकोला : जिल्ह्यातील कवठा गावातील एका मतदाराने  ईव्हीएमला विरोध करीत मतदान केंद्रावरील ईव्हीएम फोडल्याची घटना घडली आहे.   श्रीकृष्ण घ्यारे असं त्याचं नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.  
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ९५ जागांसाठी आज मतदान सुरु झालं आहे. विदर्भातील तीन, मराठवाड्यातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर अशा महाराष्ट्रातील एकूण दहा जागांसाठी मतदान होत आहे. सोलापूरमधील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची घटना ताजी असतानाच, अकोला जिल्ह्यातील कवठा गावातील मतदान केंद्रावर आलेल्या श्रीकृष्ण नावाच्या मतदारानं ईव्हीएम फोडल्याची घटना घडली. ईव्हीएमला विरोध असल्यानंच मशीनची तोडफोड केल्याचा दावा त्यानं केला आहे. या घटनेमुळं मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत श्रीकृष्ण घ्यारे याला ताब्यात घेतलं आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-04-18


Related Photos