महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे विरोधात तालुका काँग्रेस कमिटी, सावलीचा निषेध


- संभाजी भिडेवर गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटी, सावली तर्फे राज्य शासनास करण्यात आहे.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा खळबळजनक दावा भिडेंनी अमरावती दौऱ्यात केला. संभाजी भिडे सारखी व्यक्ती आपल्या राष्ट्रपित्याबद्दल टिका-टिपणी करतो ही संपूर्ण देशासाठी लाजिरवानी बाब आहे. भिडेच्या या मनुवादी वक्तव्याचा तीव्र निषेध राज्यभरात पडसाद उमटले.

देशात सर्वधर्मसमभावाचा उपदेश द्यायला नको. असे उपदेश देणाऱ्यांना राजकारणातून हद्दपार करावे,असे देखील भिडे म्हणाले. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट न गेले आहे परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढाऱ्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व ळवून हिंदुस्थानची अधोगती झाली,असेही भिडे म्हणाले होते.

भिडेंच्या वादग्रस्त विधानाविरोधात सावली तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक झाली असून सावली शहारात जागोजागी संभाजी भिडे विरोधात निषेध नोंदविण्यात आला.अश्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, देशात अराजकता पसरविणाऱ्याचे व देशातील कोणत्याही महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना तात्काळ बंदोबस्त करा, भिडेवर गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटी, सावली तर्फे राज्य शासनास केली आहे.

निषेध करताना सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुकाध्यक्ष उषा भोयर,माजी सभापती प.स. सावली विजय कोरेवार,सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार, सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर कारडे, युवकप् काँग्रेस शहराध्यक्ष अमर कोणपत्तीवार, नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्षा लता लाकडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी,बोथलिचे उपसरपंच विजय गड्डमवार, हिरापूरचे उपसरपंच शरद कन्नाके, उसेगावचे उपसरपंच सुनील पाल, उपसभापती राजेंद्र भोयर,पाणीपुरवठा सभापती अंतबोध बोरकर, तसेच नगरसेवक प्रफुल वाळके, सचिन सांगिडवार, प्रीतम गेडाम, गुणवंत सुरमवार, नगरसेविका अंजली देवगडे, राधा ताटकोंडावार,तसेच आकाश बुरिवार, आशिष आखाडे, किशोर घोटेकर, निखिल दुधे, आकाश खोब्रागडे, श्रीकांत बहिरवार जनसंपर्क कार्यालय प्रमुख  कमलेश गेडाम, बादल गेडाम आदी काँग्रेसचे पदाधिकारी, नगर पंचायत सावलीचे नगरसेवक व सर्व फ्रंटल ऑरगॅनिझेशनचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos