त्या अपघातातील जखमींना जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /अहेरी :
आज भामरागड तालुक्यातील मेडपल्ली जवळ महिंद्रा मॅक्स व आयशर ट्रक यांच्यात झालेल्या भिषण अपघातात ४ जण ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले . सदर घटनेची माहिती जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना मिळताच त्यांनी उपजिल्हा रूग्णालय अहेरी येथे धाव घेवून जखमीना भेट दिली व विचारपूर करून जखमींना आवश्यक ते मदत करण्यात येईल असे बोलले. यावेळी अविस चे संतोष ताटकोंडावार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-17


Related Photos