ताडोबातील वाघिणीच्या शिकार प्रकरणी तिघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
चंद्रपूरच्या ताडोबा राष्ट्रीय अभयारण्यात वाघिणीची शिकार केल्या प्रकरणी ३  जणांना अटक करण्यात आली आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या सापळ्यात अडकून या वाघिणीचा तडफडून मृत्यू झाला होता. चंद्रपूरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील खातोडा गेट परिसरात तारांच्या सापळ्यात मृतावस्थेत वाघीण आढळली होती. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींनी संताप व्यक्त करून प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी ताडोबात तळ ठोकून होते. वन विभागाच्या तपासात ताडोबातील रहिवाशांनीच ही शिकार केल्याचे उघड झाले आहे. 
सुरेश कन्नाके (२९) , रमेश मसराम (४१)  दोघेही राहणार पळसगाव  आणि अमोल आत्राम (२३) रा. खुटवंडा  येथील रहिवासी रहिवासी असून त्यांना  अटक करण्यात अली आहे . या तिघांनाही २० एप्रिलपर्यंत वन विभागाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-17


Related Photos