जवान दिसले तर झोडून काढा : तृणमूल काँग्रेसच्या महिला नेत्याचे वादग्रस्त विधान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोलकाता :
२०१९  निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये भाषणं करताना अनेकदा नेत्यांची जीभ घसरते. जोशात होश विसरल्यानंतर वाद ओढावल्याची प्रकरणं सध्या पाहायला मिळत आहेत. अशातच तृणमूल काँग्रेसच्या महिला नेत्या आमदार रत्ना घोष यांनी वादग्रस्त विधान केले आहे. केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान दिसले तर त्यांना झाडूने झोडून काढा असे संतापजनक विधान केले आहे. त्याच्या विधानामुळे त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
चकदाह मतदार संघाच्या आमदार असलेल्या रत्न घोष हे यांचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी निवडणुकीच्या ड्युटीवर असलेल्या जवानांना घाबरण्याचे कारण नाही, असे विधान केले आहे.महिला मोर्चाच्या सदस्यांसमोर बोलताना त्या म्हणाल्या की, लढाई जिंकायची असेल तर चांगले – वाईट असे काही बघितले जात नाही. लोकशाही किंवा लोकशाहीविरोधी तत्रांचा वापर करून आपल्याला जिंकावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना झोडल्याचे मी पाहिले आहे. त्यावेळी हाणामारी झाली होती. मात्र आता त्यांनी आपल्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर महिला कार्यकर्ता, नेता आणि अन्य कार्यकर्त्यांनी झाडू घेऊन त्यांना झोडून काढले पाहिजे असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. 

   Print


News - World | Posted : 2019-04-17


Related Photos