महत्वाच्या बातम्या

 कसारी नजीक कुजलेल्या अवस्थेत आढळला अज्ञात इसमाचा प्रेत : देसाईगंज तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील कसारी जंगल परिसरात आज २ ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात इसमाचा प्रेत कुजलेल्या अवस्थेत व प्रेताच्या जवळच दुचाकी आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे व परिसरात शंका कुशंका वाढीस लागून चर्चेला उधाण आले आहे.  सविस्तर वृत्त असे की, सकाळच्या सुमारास गावातील गुराखी गुरे चारण्याकरिता कसारी नजीकच्या जंगल परिसरात गेले असता गुराख्यास अज्ञात इसमाची दुचाकी व तोंडाच्या भारावर पलटी असलेल्या अवस्थेत अज्ञात इसम आढळून आला सदर घटनेची माहिती गुराख्याने गावातील पोलीस पाटील यांना देता लगेच पोलीस पाटील यांनी देसाईगंज पोलीस विभागास संपर्क साधला व घटनास्थळी पोलीस विभागातील कर्मचारी दाखल झाले अज्ञात इसमाची घटनास्थळी दुचाकी आढळून आली असून वाहनावरील नंबर प्लेटचा एक अंक नाही सदर इसमास शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे दाखल करण्यात आले;  असून वृत्त लिहेपर्यंत अज्ञात इसमाची ओळख पटलेली नाही पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश मेश्राम बिट अंमलदार पत्रे मेजर आनंद पिटलेवार करीत आहेत. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos