महत्वाच्या बातम्या

 नक्षल सप्ताह च्या पहिल्या दिवशी दोन आठवडी  बाजारासह कोरची तालुक्यातील बाजारपेठा शंभर टक्के बंद


- कोटगुल येथील आडवडी बाजार बंद पोलीसांचा होता चोक बंदोबस्त  ‌

- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात आजही नक्षल  दहशतीच्या भीतीने बंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची‌ : गडचिरोली जिल्हाच्या टोकावर कोरची तालुका नक्षल सप्ताह २८ जुलै ते ३ ऑगस्ट  पर्यंत नक्षल सप्ताह पाडण्याचे आवाहन केली जाते. त्या कोरची तालुक्यात नक्षल सप्ताह च्या पहिल्या दिवशी कोरची तालुक्यात नक्षल सप्ताह शंभर‌ टक्के  पाडण्यात आले.

शेतकऱ्याचं कामे बंद, कंत्रादाराचे कामे बंद, चाय टपरी, हॉटेल, किराणा दुकाण, मोटारसायकल दुकान, हिरोंहोंडा शोरूम, हेअर सलुन, भाजीपाला दुकान, खाजगी वाहतुक, बस,आदि दुकाने बंद होती‌.
पोलीसानी दुकाने सुरू करण्याचे प्रयत्नं केले. पण व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवले.
प्राप्त माहिती नुसार  आठवडी बाजार शुक्रवार कोटगुल व मसेली येथे आठवडी‌ बाजार  असतो. पण आज  आठवडी बाजार भरले नाही.

प्राप्त माहिती कोटगुल, देवुळभटी, नागपुर, वाको, अरमुरकसा, तेंलकादंड, बोरी, बेतकाठी,झगडवाही,अल्लीटोला,बोटेकसा,बिहीटेकला,कोटरा,खोलुपदीकसा,बोगाटोला,हितकसा,‌ मुलेटीपदीकसा,खुशीपार, हेटाळकसा,कैमुल,सावली, मसेली, नवेझरी, मयालघाट, मुरकुटी, जांभळी, सोनपुर, पीटेशुर, कोसमी, बेलारगोंदी, चंरवीदंड,आस्लहुडकी, कोचिनारा, दवंडी, बेलगांव घाट, जामणारा, कोहका, सातपूती, आदि गांवा नक्षल सप्ताह २८ जुलै २०२३ पहिल्या दिवशी १०० टक्के बंद पाडण्यात आले. त्या जनजिवन विस्कळीत झाले होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos