विजया बँकेचे शाखा व्यवस्थापक कन्हैय्या लाल मौर्या यांना निरोप व नागरी सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक विजया बँकेचे शाखा व्यवस्थापक कन्हैया लाल मौर्या यांचे स्थानांतरण झाल्याबद्दल विजया बँक परिवार , ग्राहक   तसेच कर्मंचारी वृंदांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. तसेच निरोप देण्यात आला.
आज १६ एप्रिल रोजी अडपल्ली (गोगाव) येथील साना लॉनमध्ये आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी ठाकरे होते. यावेळी भाऊराव कुनघाडकर, अभय कासर्लावार, मनिष कासर्लावार, रूपेश भुरसे, लौकेश माखिजा, किटे, सतिश त्रिनगरीवार , हरडे, खडसे, बँकेचे कर्मचारी अजित बोरकर तसेच इतर कर्मचारी, महिला, पुरूष तसेच बँकेचे खातेदार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाखा व्यवस्थापक मौर्या यांचा सपत्नीक  शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक मौर्या यांनी आपल्या गडचिरोलीतील सेवेबद्दल मन मोकळे केले. तसेच सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मान्यवरांनीही मत व्यक्त केले. 
  गडचिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका बँक शाखा व्यवस्थापकाचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भाऊराव कुनघाडकर यांनी केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-16


Related Photos