प्रचाराच्या तोफा थंडावल्या, १८ एप्रिल ला दुसऱ्या टप्प्यातील मतदान


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज १६ एप्रिल रोजी  थंडावल्या असून  महाराष्ट्रासह १३ राज्यांतील ९७ मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांचा समावेश आहे. 
प्रचाराच्या काळात  पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, बसपा प्रमुख मायावती, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदींनी त्यांच्या भाषणातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झाडण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २३ मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात  'या' ठिकाणी मतदान होणार 

- महाराष्ट्र (१० मतदारसंघ) : बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर 
   Print


News - World | Posted : 2019-04-16


Related Photos