उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. एन. डी. तिवारी यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. नारायण दत्त तिवारी (एनडी तिवारी) यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील घरामध्ये रोहित बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आला. यानंतर त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु उपचापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील डिफेन्स कॉलनीतील घरामध्ये रोहितच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसताच घरातील नोकरांनी त्याच्या आईला फोन करून याची माहिती दिली. त्यावेळी रोहितची आई रुग्णालयात तपासणी करण्यासाठी गेली होती. तेथून घरी पोहोचल्यानंतर मुलाला घेऊन त्या रुग्णवाहिकेने मॅक्स हॉस्पिटलमध्ये गेल्या. या ठिकाणी डॉक्टरांनी रोहितला मृत घोषित केले.
२००८  मध्ये रोहित शेखर नावाच्या व्यक्तीने तिवारी माझे ‘बॉयलॉजिकल फादर’ असल्याचा दावा केला होता. यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार एनडी तिवारी यांची डीएनए टेस्ट करण्यात आली होती. यात रोहित शेखर त्यांचाच मुलगा असल्याचे सिद्ध झाले. न्यायालयाने २७ जुलै, २०१२ ला डीएनए अहवाल पाहिल्यानंतर रोहितच्या बाजूने निर्णय दिला होता.   Print


News - World | Posted : 2019-04-16


Related Photos