राज्य महामार्गाच्या कामामुळे प्रचंड वाहतूककोंडी, काम संथगतीने


- अपघाताचा धोका बळावला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरातील धानोरा मार्गावर तसेच चंद्रपूर मार्गावर राज्य महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू असून दोन्ही मार्गांवर प्रचंड वाहतूकीची कोंडी होत आहे. यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. तसेच मार्गाचे काम संथगतीने करण्यात येत असल्याचा आरोप नागरीकांमधून केला जात आहे.
गडचिरोली शहरातील चारही मुख्य मार्ग आधीच अरूंद आहेत. अशातच शहरातून सुरू करण्यात आलेल्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. शहरातून मोठ्या प्रमाणात जड वाहने आवागमन करतात. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्याही प्रचंड आहे. सायंकाळच्या वेळी नागरीक खरेदीसाठी तसेच इतर कामासाठी बाहेर पडतात. यामुळे मार्गावर गर्दी वाढते. अशातच अवजड वानांमुळे दोन्हीकडील वाहने खोळंबून पडत असल्यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस ठाणे ते स्टेट बॅंकेपर्यंत वाहनांच्या रांगाच लागून राहत आहेत. तसेच धानोरा मार्गावरील वैभव हाॅटेलसमोर रस्ता अरूंद असल्यामुळे वाहने खोळंबून पडत आहेत. ऐन निवडणूकीच्या कालावधीत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र कामामध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप नागरीकांमधून होत आहे. तसेच अनेक दिवसांपासून काम सुरू असून कामाची गती संथ असल्यामुळे अद्याप रस्ता खोदूनच ठेवण्यात आला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-16


Related Photos