महत्वाच्या बातम्या

 आरटीओ कार्यालयातील कालबाह्य अभिलेख्यांचा लिलाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कालबाह्य झालेल्या अभिलेख्यांचा लिलाव केला जाणार आहे. त्यासाठी ईच्छूक खरेदीदारांकडून १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत दरपत्रक मागविण्यात आले आहे.

विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले दरपत्रक स्विकारले जाणार नाही. तसेच दरपत्रक मान्य किंवा रद्द करण्याचे अधिकार कार्यालयास राहतील. निविदेबाबतच्या अटी व शर्ती कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आलेल्या आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos