जेट एअरवेज बंद झाल्यास २० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गदा


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : देशातली दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी विमानसेवा असलेली ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे.   जेट एअरवेज चालू ठेवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. जेट एअरवेज बंद झाली तर २० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. काल जेटच्या कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या वाचवण्यासाठी मोदींना आवाहन केले.
या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी जेटला आणखी १५०० कोटी रुपये कर्ज देण्याची योजना होती. पण बँकेने आता कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निधीअभावी जेट एअरवेज बंद होऊ शकते. जेट एअरवेज सुरु ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधनासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आहे.
जेटचे संस्थापक नरेश गोयल यांनी जेटमधील हिस्सा विकत घेण्यावरुन माघार घेतली आहे. नरेश गोयल यांनी माघार घेतली नाही तर आम्ही बोली लावण्याच्या प्रक्रियेतून माघार घेऊ असे इतिहाद आणि टीपीजी कॅपिटलने आधीच स्पष्ट केले.
नोव्हेंबर महिन्याात जेटकडे १२४ विमानांचा ताफा होता. पण सध्या फक्त सात विमाने उड्डाण करत आहेत. जेटकडे निधी नाहीय. तेल कंपन्यांनी त्यांना इंधन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जेट पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. विमान वाहतूक सुरु ठेवण्यासाठी जेटकडे पैसा नाहीय. कंपनी सुरु ठेवण्यासाठी कर्ज मिळवण्याचा आणि खरेदीदार शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  Print


News - World | Posted : 2019-04-16


Related Photos