महत्वाच्या बातम्या

 कृषि साहित्य उत्पादक व पुरवठादारांनी नोंदणी करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांना कृषि साहित्याचा पुरवठा करण्याकरीता ईच्छुक पात्र कृषि साहित्याचे उत्पादन व पुरवठा करण्याऱ्या कंपन्यांनी नोंदणीचे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्य शासनामार्फत संरक्षित शेती तंत्रज्ञानास कृषि विभागाच्या विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देऊन प्रोत्साहन दिले जाते. संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृह, शेडनेटगृह, प्लॉस्टिक मल्चींग, द्राक्ष पिकांसाठी प्लास्टिक कव्हर, डाळिंब पिकासाठी ॲन्टी हेल नेट या घटकाचा समावेश आहे. कृषि विभागाच्या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचे साहित्य पुरवठा होणे, साहित्याची गॅरंटी, वॉरंटी व दुरुस्ती याबाबत हमी मिळणे याअनुषंगाने पॉलिफिल्म टेपनेट, मोनोनेट, ॲप्रॉन पेपर, प्लॅस्टिक आच्छादन, जीआय पाईप, द्राक्ष पिकांसाठी ॲन्टी हेलनेट कव्हर या साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्याची नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे यांचे मार्फत राबविण्यात येणार आहे.

नोंदणी प्रक्रिया राबविण्याकरीता अटी व शर्तीच्या अधीन राहून उत्पादक कंपन्यांनी नोंदणीचे प्रस्ताव १४ ऑगस्ट पर्यंत पाठवावे. नोंदणी प्रक्रियेबाबतच्या अटी व शर्ती कृषि विभागाच्या www.mahanhm.in , www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos