महत्वाच्या बातम्या

 सिरोंचा येथे भाजपाचा सेवा पंधरवड्यात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले रुग्णवाहिकेचे लोकार्पण 


- सिरोंचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत २०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात केला प्रवेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या वाढदिवसापासुन भाजपा महाराष्ट्र प्रदेश तर्फे सुरु असलेल्या सेवा पंधरवडा अभियानाचे औचित्यसाधुन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या सौजण्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा येथील जगदंब फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेला रुग्णवाहीका देण्यात आली होती, त्या रुग्णवाहीकेचे लोकार्पण नुकतेच मोठ्या थाटात सिरोंचा येथील क्रीडा संकुल पटांगणात राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. 

रुग्णवाहीकेचे लोकार्पण कार्यक्रमात जगदंब फाऊंडेशनने राजे अम्ब्रीशराव महाराजांचे आभार मानले. त्यांनी दिलेल्या निधीमुळेच रुग्णवाहीकेची अडचण असलेल्या भागातील जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका घेणे शक्य झाल्याचे सांगीतले, याचा उपयोग सिरोंचा तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात होणार असल्याचे त्यांनी सांगीतले, तसेच राजेंच्या तळमळ आणि परोपकाराच्या भावनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या एक दिवसीय झंझावाती सिरोंचा दौऱ्यात विविध पक्षांचा २०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजेंचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत भाजपा मध्ये अधिकृत प्रवेश केला, यामध्ये युवकांसह लोकप्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या, अन्य राजकीय पक्षाच्या सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने इतर पक्षांना मोठे खिंडार पडले आहे. कार्यक्रमादरम्यान राजे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भाजपाचा विजय असो...अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. 

यावेळी राजेंनी कार्यकर्त्यांच्या प्रत्येक सुखःदुखात तुमचा पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली. तसेच पक्षात सामील झालेले कार्यकर्ते भाजपच्या बळकटीकरण आणि विस्तारासाठी सक्रिय भूमिका बजावतील अशी अपेक्षा ही व्यक्त केली, आगामी निवडणुकीत भाजपसाठी निष्ठेने आणि जोमाने काम केल्यास भाजप उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा राजेंनी विश्वास व्यक्त केला. ह्यावेळी सिरोंचा येथिल भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जगदंब फाऊंडेशन सिरोंचाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos