महत्वाच्या बातम्या

 लग्नास नकार दिल्यामुळे तरुणीची लोखंडी रॉडने हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील पॉश परिसर असलेल्या मालवीय नगरमध्ये दिवसाढवळ्या एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कॉलेजसमोरच एका तरुणीच्या डोक्यात रॉड मारुन हत्या करण्यात आली आहे. लग्नास नकार दिल्यामुळे आरोपीने तरुणीवर हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी फरार आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव नरगिस असून, तिच्यावर आरोपी इरफानने रॉडने हल्ला केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांना आज दुपारी १२ च्या सुमारास अरबिंदो कॉलेजजवळ एका मुलीची हत्या केल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस तिथे गेले असता विजय मंडळ पार्कमध्ये एका मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. 

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा नरगिसच्या डोक्यातून रक्त येत होते. तिच्या मृतदेहाजवळ लोखंडी रॉडही सापडला असून, पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. रॉड फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. घटनेनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले, चौकशीदरम्यान त्याने खुनाची कबुली दिली. 

कालही एकाची हत्या -

दरम्यान, दिल्लीतील डाबरी येथे गुरुवारी (२७) रात्री एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आशिष असे या हत्येतील आरोपीचे नाव असून त्याने नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. रेणू गोयल असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी रेणूचा मोबाईलही जप्त केला आहे. पोलीस त्याचा सीडीआर तपासत आहेत. 





  Print






News - World




Related Photos