हुंड्यासाठी पत्नीची जाळून हत्या करणाऱ्या आरोपीस ७ वर्ष कारावास


- चंद्रपूर येथील न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर
: हुंड्याच्या मागणीसाठी शारीरीक आणि मानसिक त्रास देवून पत्नीला जाळून मारणाऱ्या आरोपीस चंद्रपूर येथील प्रमुख जिल्हा न्यायाधिश एस.डी. दिग्रसकर यांनी ७ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. गजानन दत्तात्रेय सूर्यवंशी (४२) रा. आंबोडा ता. महागाव जि. यवतमाळ असे आरोपी पतीचे नाव आहे.
सिंदेवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादीच्या मुलीचे २६ मार्च २००९  रोजी आरोपी गजानन सूर्यवंशी याच्यासोबत लग्न झाले होते. ती आपल्या पतीसोबत राहत असताना आरोपी गजानन पत्नीला वारंवार माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास देत होता. आरोपीने माहेरून ५ लाख रूपये आणण्याच्या मागणीसाठी तगादा लावला. तिने नकार दिल्यामुळे तिच्या अंगावर राॅकेल टाकून पेटवून दिले. अशी तक्रार मृतक महिलेच्या वडीलाने सिंदेवाही पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी कलम ४९८ अ, ३०४ ब भादंवि सहकलम ४ हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एम.जी. पठाण यांनी पुर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले.  सुनावणीदरम्यान न्यायालयात साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे आज १५ एप्रिल रोजी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपीला ७  वर्ष कारावास व ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-15


Related Photos