महत्वाच्या बातम्या

 नागपूर : कचरा वेचणाऱ्याची अल्पवयीन मुलाकडून हत्या 


- त्याच्यामागे पळणाऱ्या आईला पोलिसांनी हटकले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : कचरा वेचणाऱ्या एका व्यक्तीची अल्पवयीन मुलाने तलवारीचे १५ हून अधिक वार करत हत्या केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती.
पहलवान शहा बाबा दर्गा मार्गाजवळ ही घटना घडली. रात्री अडीच वाजताच्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्यातील रात्रीचे गस्ती पथक त्या मार्गावरून जात असताना एक १७ वर्षांचा मुलगा पळत जाताना दिसला. त्याच्यामागे एक ४० वर्षीय महिला पळत होती. पोलिसांनी महिलेला थांबवून तिला नेमका प्रकार विचारला असता तिने तो तिचा मुलगा असल्याचे सांगितले.

मुलाने एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा तलवारीचे वार करत खून केला असून तो पळत असल्याची तिने माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता शेखर नावाचा व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अल्पवयीन मुलाने त्याच्या थातीवर तसेच पोट व कंबरेवर तलवारीचे वार करून हत्या केली होती. हत्येत वापरण्यात आलेली तलवार तेथेच पडली होती. पोलिसांनी या प्रकरणात १७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos