२५ हजारांची लाच स्वीकारताना एसडीपीओ कार्यालयातील दोन सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर
: रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता तसेच प्रत्येक ट्रिपमागे २ हजार ५०० रूपयांप्रमाणे पैशांची मागणी करून २५ हजारांची लाच स्वीकारताना रामटेक येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील दोन सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 
  हरीशचंद्र बमनोटे  (५६) आणि राजू अवजे (५२) अशी लाचखोर सहाय्यक फौजदारांची नावे आहेत.   तक्रारदार   मनसर तह. रामटेक जि. नागपूर येथील रहीवासी असुन शेतीचे व ट्रॅक्टरवर रेती  वाहतुकीचे काम करतो. तक्रारदार   रामटेक पासुन ३ कि.मी. अंतरावरील सुर नदीतून  गावातील बांधकामासाठी ट्रॅक्टर ट्राली ने रेतीची वाहतुक करत होता. सदरच्या नदीवर शासनाचा अधिकृत घाट लिलाव होत नसल्याने गावातील ईतर लोक देखील आवश्यकतेप्रमाणे तेथुन रेतीची वाहतुक करतात. तक्रारदारावर यापुर्वी ट्रॅक्टरवर रेतीचे वाहतुक करत असतांना पकडुन पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद केला होता. तक्रारदाराची ट्रॅक्टर व ट्राली सुटल्यानंतर क्र.   हरीशचंद्र   बमनोटे व राजू अवजे   यांनी तक्रारदारास फोनवर संर्पक करून कार्यालयाजवळ बोलविले व स.फौ. हरिशचंद्र बमनोटे व वाहन चालक स.फौ. राजू अवजे यांनी तक्रारदारास रेतीची वाहतुक करायची असेल तर आम्हाला प्रत्येक गाडीचे २ हजार ५०० प्रमाणे एकुण १३ गाड्यांचे  ३२ हजार ५०० रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदारास  लाच रक्कम देण्याची  इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार नोंदविली.  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर तर्फे  आज १५ एप्रिल रोजी सापळा कार्यवाही आयोजीत केली . सापळा कार्यवाही दरम्यान स.फौ. हरिशचंद्र बमनोटे व वाहन चालक  राजू अवजे यांनी  लाचेची मागणी करून तडजोडअंती २५ हजारांची  लाच स्विकारली. यावरून दोन्ही आरोपीविरूध्द   रामटेक  पोलिस ठाण्यात   लाचलुचपत प्रतिबंध कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदर कारवाई पोलीस अधिक्षक  श्रीकांत धिवरे, (अतिरिक्त कार्यभार) , अपर पोलीस अधिक्षक  राजेश  दुद्दलवार,  यांच्या मार्गदर्शनात  पोलीस उप अधीक्षक   शंकर शेळके, पोहवा प्रविण पडोळे नोपाशि  लक्ष्मण परतेती, प्रभाकर बले, पोशि  सरोज बुधे चालक स.फौ. परसराम शाही  यांनी केली आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-04-15


Related Photos