महत्वाच्या बातम्या

 मणिपूर मध्ये झालेल्या अमानवीय घटना संदर्भात सर्व पक्षीय महिला संघटनांकडुन जाहीर निषेध


- महामहीम राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे दोषींवर कार्यवाही करण्यासंदर्भात मागणी. 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : मणिपूर येथील आदिवासी स्त्रीयांवर बलात्कार करुन नग्नावस्थेत दिंडी काढण्यात आली व त्यांच्या अब्रुची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगून देशाची मान शरमेने खाली झुकवण्यात आली. मानवतेला काळीमा फासणारी जी घटना घडली या अमानवीय घटनेविरुद्ध माजी जि.प. सदस्या प्रमिला कांटेगे यांच्या नेतृत्वाखाली कोरची तालुक्यातील सर्वपक्षीय महिला संघटनेने तहसील कार्यालय कोरची येथील पटांगणात जाहीर निषेध करुन तहसीलदार साहेब कोरची यांच्या मार्फत देशाचे  महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. मणिपूर मध्ये अमानवीय कृत्य करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच मणिपूर राज्यात शांती बहाल करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहेत. 

यावेळी समाजसेविका कुमारी जमकातन, राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा गिरीजा कोरेटी, माजी नगराध्याक्षा ज्योती नैताम, नगरसेविका दुर्गा मडावी, सरपंचा कौशल्य काटेंगे, सरपंचा कुंती हुपुंडी, ग्रामपंचायत सदस्या सुगना काटेंगे, शिला सोनकोतरी, बसंती नैताम व बहुसंख्येने महिला उपस्थित होते.

देशाला स्वातंत्र्य होऊन ७५वर्षे पुर्ण होऊन आपण आझादीचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत, देश विश्व गुरुच्या दिशेने मार्गक्रम करत आहे, एका बाजुला देशाचे राष्ट्रपती महिला आहेत, ऐतिहासिक चांद्रयान -३ चे नेतृव एक महिलाच करत आहे, बेटी पढाओ, बेटी बचाओ असे नारा देतो. मात्र मणिपूर येथील घटना बघून मन सुन्न होते व अंगाला शाहारे येतात. - गिरीजा कोरेटी





  Print






News - Gadchiroli




Related Photos