महत्वाच्या बातम्या

 वाहतूक नियमाबाबत नागरिकांना मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा महामार्ग वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने वरोरा शहरातील एलआयसी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी मार्केट यार्ड मध्ये उपस्थित नागरिकांना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा दुचाकी व चार चाकी वाहन चालवताना भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, कोणतीही नशा करून कोणतेही वाहन चालवू नय, दुचाकी वाहनावर तिघे बसून प्रवास करू नये, वाहन ओव्हरटेक करताना समोरील रस्ता मोकळा असल्यास ओव्हरटेक करावे, वळण रस्त्यावर ओव्हरटेक करू नये, वाहन चालविताना वेग मर्यादेचे पालन करावे, अठरा वर्षे पेक्षा कमी वय असणाऱ्या मुला मुलींना वाहन चालवण्यास देऊ नये, यासोबतच इंटरसेप्टर वाहन डिवाइस चालन वाहतूक नियम नियम उल्लंघन दंड आकारण्याबाबत विस्तृत माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली. 

सदर उपक्रम महामार्ग पोलीस अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र सिंघल, महामार्ग पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गौरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविला. 





  Print






News - Chandrapur




Related Photos