महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२८ जुलै महत्वाच्या घटना

१८२१ : पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९३३ : सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९३३ : अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९३४ : पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.

१९४३ : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.

१९७६ : चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ ठार तर १,६४,८५१ जखमी झाले.

१९७९ : भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.

१९८४ : लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९९८ : सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.

१९९९ : भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.

२००१ : आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

२८ जुलै जन्म

१९०७ : टपर वेअरचे संशोधक अर्ल टपर यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८३)

१९२५ : हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २०११)

१९२९ : जॉन एफ. केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांचा जन्म.

१९३६ : वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स यांचा जन्म.

१९४५ : अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म.

१९५४ : व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च २०१३)

१९७० : झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग यांचा जन्म.

२८ जुलै मृत्यू

४५० : ४५०ई.पुर्व : पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल ४०१)

१७९४ : फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे यांचे निधन.

१८४४ : नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १७६८)

१९३४ : दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड यांचे निधन.

१९६८ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८७९)

१९७५ : चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ – फोंडा, गोवा)

१९७७ : गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन.

१९८१ : नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)

१९८८ : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनऊत हत्या.





  Print






News - todayspecialdays




Related Photos