ढगाळ वातावरण, अवकाळी पावसामुळे लग्नकार्य, कार्यक्रमांवर संकट


- ग्रामीण भागातील वधू - वर पित्यांची चिंता वाढली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
लग्न म्हटले की, जुळवा - जुळव, पाहुणे मंडळी आनंदाचे वातवरण. मात्र सध्या निसर्गाचा लहरीपणा सुरू असल्यामुळे वधू - वर पक्ष आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. सध्या लग्नसराईचा तसेच विविध कार्यक्रमांचा धडाका सुरू असताना मध्येच पाऊस हजेरी लावत असल्यामुळे नियोजन कोलमडत असून प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच नुकसानीला समोरे जावे लागत आहे.
सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरीक आपल्या पाल्यांच्या विवाहासाठी जुळवा जुळव करून मंडप, जेवन, वऱ्हाड नेण्याची व्यवस्था, कपडा - लता, धान्य अशी तजविज केली. लग्न म्हटले की, पाहुण्यांची रेलचेल असते. भोजनाच्या मोठमोठ्या पंगती असतात. ग्रामीण भागात कोणत्याही सभागृहांची किंवा पावसामुळे व्यत्यय येणार नाही अशी जागा उपलब्ध नसल्याने केवळ मंडप, डेकोरेशनच्या सहाय्याने कार्यक्रम आटोपते घ्यावे लागतात. मात्र सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे वादळ, पाऊस गारपीट होत असल्यामुळे मोठी पंचाईत होत आहे. वातावरणात बदल झाले आहे. उन्ह काही प्रमाणात कमी झाले असले तरी उकाडा कायम आहे. यातच विद्युत पुरवठा खंडीत होत राहत असल्यामुळे आणखीच त्रासदायक होत आहे. अशा परिस्थितीत कायक्रम निर्विघ्न पार पाडण्यासाठी वधू - वर पित्यांची ससेहोलपट होत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-15


Related Photos