महत्वाच्या बातम्या

 युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाज्योती कडून आर्थिक सहाय्य


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महात्मा ज्योतिबा संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर २०२३ या वर्षासाठी युपीएससी मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना प्रत्येकी ५० हजार रुपये एक रकमी अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यात येत आहे. 

महाज्योती मार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील युपीएससी पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी ५० हजार रुपये अर्थसहाय्य करण्याकरिता अर्ज मागविण्यात आलेले होते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३५६ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३१४ विद्यार्थी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहे. यातील २९८ विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये एक रकमी अर्थसहाय्य त्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात आले आहेत. महाज्योतीने आत्तापर्यंत रु. १ कोटी ४९ लाख इतक्या निधीचे विद्यार्थ्यांना वितरण केलेले असून उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बँक तपशील सादर केल्यावर त्यांना ७ लाख रुपये निर्धारीत करण्यात येईल.

युपीएससी मुख्य परीक्षा ही १५ सप्टेंबर २०२३ रोजी होणार असून महाज्योतीच्या उमेदवारांना वितरीत केलेल्या अर्थसहाय्याचा या परीक्षेच्या तयारीसाठी लाभ होणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos