ताडोबा व्याघ्रप्रकल्पात नियमांना धाब्यावर बसवून वनकर्मचाऱ्याकडून वाघिणीचा छळ


- कोळसा परीक्षेत्रातील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परीक्षेत्रात एका मद्यधुंद वनकर्मचाऱ्याने आज सर्व नियमन धाब्यावर ठेऊन वाघिणीचा छळ केला. कोळसा क्षेत्रातील रायबा परिक्षेत्रात एका पाणवठ्यावर दोन पिलांसह वाघिण पाणी पीत होती , दरम्यान दुचाकीवर एका वनमजुरासह झाडे नावाचा कर्मचारी हा  तिथे पोहचला व  वाघिणीचे फोटो काढण्यासाठी  थेट वाघिणीजवळ गेला. त्यादरम्यान पर्यटक सुद्धा  वाघिणीला बघत  होते.  परंतु  हा कर्मचारी थेट वाघिणीजवळ गेला आणि फोटो काढू लागला.
वाघिणीला डिवचण्यासाठी वेगवेगळे आवाज काढू लागला. पर्यटकांच्या जिप्सीवरील गाईडने त्याला हटकले, पण तो मुजोरीवर आला आणि पर्यटकांनाच धमकी देऊ लागला. याच दरम्यान वाघीण पाणवठ्यावरून पिलांसह निघून गेली. पण एका पर्यटकाने या मद्यधुंद कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून, या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे. वन कर्मचारीच कशाप्रकारे नियमांना धाब्यावर बसवत आहेत, हे यावरून दिसून आलं आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-15


Related Photos